Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह

Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह

दोन अर्ज दाखल, १० मतदारसंघांत प्रतीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) अर्ज विक्री व दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मालेगाव बाह्य व नाशिक पूर्व मतदारसंघातून (Malegaon Outer and Nashik East Constituencies) २ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तर नाशिक शहर परिसरातील पाच मतदारसंघातून ११८ झाली आहे. उर्वरित १० विधानसभा मतदारसंघात अर्ज विक्री निरंक राहिलेली आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यात नाशिक पूर्वमधून प्रमोद दत्तात्रय सानप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर मालेगाव बाह्य मतदार संघामधून विश्वास वामनराव देवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज (Independent Nomination Application) दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज नेण्यात नाशिक पश्चिमने (Nashik West) आघाडी मारली असून, पहिल्याच दिवशी ३७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने दशरथ पाटील, सुधाकर बडगुजर, डी.एल. कराड दिनकर पाटील, प्रदीप पेशकार, अपूर्व हिरे, हर्ष बडगुजर, मयूर अलई, अरुण पाटील यांच्यासह ३७ इच्छुकांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ देवळाली १२६ मतदारसंघातून २६ अर्ज विक्री झाली आहे. त्यात प्रामुख्याने रविकिरण घोलप, रामदास सदाफु ले, सरोज आहिरे, धरम गोविंद यांच्यासह २६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

तसेच नाशिक पूर्व (Nashik East) १२३ या मतदारसंघातून २४ अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज नेणाऱ्यामध्ये प्रामुख्याने कल्पना पांडे, रंजना बोराडे, प्रसाद सानप यांच्यासह २४ जणांचा समावेश आहे. नाशिक मध्य १२४ या मतदारसंघात १६ अर्ज विक्री झाली असून, त्यात प्रामुख्याने हेमलता पाटील, आकाश छाजेड, गजानन शेलार, दशरथ पाटील, हनीफ बशीर, वसीम शेख, गुलजार कोकणी यांच्या इच्छुकांचा समावेश आहे. तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या मतदारसंघात १५ अर्जांची विक्री झाली आहे. त्यात प्रामुख्याने विष्णू दोबाडे, उषा बॅडकोळी, संदीप चारोस्कर, निर्मला गावित, लकी जाधव, निवृत्ती कातोरे, प्रमोद मेंगाळ यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे

तीन खर्च निरीक्षक दाखल

नाशिकच्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्याचा पदभार मंगळवारी स्वीकारला. विधानसभा क्रमांकानुसार नाशिक ११३ ते नाशिक ११७ वा विधानसभा मतदारसंघासाठी एक, ११८ ते १२२ या विधानसभा मतदारसंघासाठी एक आणि १२३ ते १२७ या विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या खचौचे निरीक्षण करण्यासाठी एक असे तीन खर्च निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकाच्या माध्यमातून उमेदवारांसाठी निश्चित केलेल्या ४० लाखांच्या खर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे. मंगळवारी या निरिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांची भेट घेऊन आपल्या कामाला प्रारंभ केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या