Thursday, January 8, 2026
Homeनाशिकमोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर; 'नाशिक मध्य'चा उमेदवार ठरला

मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर; ‘नाशिक मध्य’चा उमेदवार ठरला

मुंबई | Mumbai

राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा (Mahayuti and Mahavikas Aagahdi) अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. मात्र, दोन्ही युती-आघाड्यांतील घटक पक्षांकडून उमेदवारांची (Candidates) घोषणा करण्यात येत आहे. अशातच आता भाजपकडून (BJP) २२ जणांची दुसरी यादी (Second List) जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : भाजपचा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला; नाशिक पूर्वमधून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

YouTube video player

या यादीनुसार, खडकवासला-भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट- सुनील कांबळे, कसबा-पेठ-हेमंत रासने,जत-गोपीचंद पडळकर, पेण-रवींद्र पाटील, पंढरपूर-समाधान औताडे, धुळे ग्रामीण-राम भदाणे, वाशीम (अजा) श्याम खोडे, मेळघाट- केवलराम काळे, गडचिरोली-मिलिंद नरोटे, राजुरा-देवराम भोंगळे, ब्रम्हपुरी-कृष्णलाल सहारे, अकोला पश्चिम-विजय अग्रवाल, अकोट-प्रकाश भारसाकळे, मलकापूर- चैनसुख संचेती, वरोरा-करण देवतळे, विक्रमगड-हरिश्चंद्र भोये, उल्हासनगर-कुमार आयलानी, लातूर ग्रामीण-रमेश कराड, सोलापूर शहर मध्य-देवेंद्र कोठे, शिरोळ-सत्यजित देशमुख, नाशिक मध्य-देवयानी फरांदे यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यमध्ये वसंत गिते विरुद्ध वसंत गिते

दरम्यान, या यादीत गेल्या अनेक दिवसांपासून तिढा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नाशिक मध्य मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.नाशिक मध्य मतदारसंघातून (Nashik Central Constituency) भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक मध्यचा तिढा सुटला आहे. भाजपकडून आत्तापर्यंत १२१ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....