Tuesday, September 17, 2024
Homeराजकीय१९७७ चा दाखला देत शरद पवारांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य!

१९७७ चा दाखला देत शरद पवारांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य!

कोल्हापूर | Kolhapur

- Advertisement -

विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर ठेऊन लढायची की बिनचेहऱ्याची यावरून महाविकास आघाडीत ठिगण्या पडत आहेत. उद्धव ठाकरे यांचा चेहऱ्यावर निवडणूक लढायची, असं मत शिवसेना ठाकरे गटाकडून व्यक्त केलं जात आहे. तर, महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला समोरे जायचं, असं राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसकडून म्हटलं जात आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी ‘महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आत्ताच जाहीर करावा, त्याला माझा पाठिंबा राहील, अशी भूमिका मांडून उद्धव ठाकरे यांनी गुगली टाकली होती. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार) यांनी १९७७ चा दाखला देत शरद पवारांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यांच्या या वक्तव्याने मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा प्रश्नच मार्गी लागल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा : …याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का?; नेहरूंचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरेंना…

निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? चेहरा का घोषित केला जात नाही असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचं घोडे कुठेही अडलं नाही. निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा असतो. अजून कशाचाही पत्ता नाही. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असं वातावरण आहे. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत आताच मांडणी करण्याची आवश्यकता नाही.”

तसेच, “१९७७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणलाही पुढं केलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी जाहीर केलं की, आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र येत निवडणुकीला सामोरे गेले. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं. मते मागताना कधीही मोरारजी देसाई यांचं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आत्ताच नाव जाहीर करण्याची आवश्यकता नाही. जनतेचा पाठिंबा मिळाल्यानंतर स्थिर सरकार राज्यात आणि देशात देऊ. संख्याबळ आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असावा याच निर्णय घेवू,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, “मालवणमधील पुतळा…

- Advertisment -

ताज्या बातम्या