नाशिक | Nashik
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आज सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यत
६.६१ टक्के मतदान झाले होते. तर नाशिक जिल्ह्यात ६.९३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात १८.८२ टक्के इतके मतदान झाले आहे.
यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नांदगाव मतदारसंघात १६.४६, मालेगाव मध्य मतदारसंघात २२.७६ , मालेगाव बाह्यमध्ये १७.३७, बागलाण १८.२३, कळवण १८.२४, चांदवड २१.३०, येवला २०.९२, सिन्नर २१.१०, निफाड १७.६४, दिंडोरी २६.४१, नाशिक पूर्व १३.९०, नाशिक मध्य १८.४२, नाशिक पश्चिम १६.३२, देवळाली १५.०१ आणि इगतपुरीत २०.४३ असे एकूण १८.८२ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत झाले आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६.९३ टक्के मतदान
नांदगाव मतदारसंघात ४.९२, मालेगाव मध्य मतदारसंघात ९.९८, मालेगाव बाह्यमध्ये ६.३०, बागलाण ६.११, कळवण ८.९१, चांदवड ६.४९, येवला ६.५८, सिन्नर ८.०९, निफाड ५.४०, दिंडोरी ९.७१, नाशिक पूर्व ६.४३, नाशिक मध्य ७.५५, नाशिक पश्चिम ६.२५, देवळाली ४.४२ आणि इगतपुरीत ६.८८ असे एकूण ६.९३ टक्के मतदान नाशिक जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा