मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल (Result) शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) २३६ तर मविआला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप पक्षाला ऐतिहासिक असे यश मिळाले आहे. भाजपने एकट्याने २८८ पैकी १३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या १६ जागांवर विजय मिळविता आला आहे.
तर लोकसभा निवडणुकीत फक्त एक उमेदवार (Candidate) निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठी मुसंडी मारत विधानसभेला ४१ जागा निवडून आणल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या १० जागांवर विजय मिळाला आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या २० जागांवर विजय मिळाला आहे. अशातच आता यंदा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली? याची आकडेवारी समोर आली आहे.
या आकडेवारीनुसार भाजपला ०१ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसला (Congress) पडली असून काँग्रेसला ८० लाख २० हजार ९२१ मते मिळाली आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट असून शिवसेनेला (Shivsena) काँग्रेसपेक्षा थोडेच कमी म्हणजेच ७९ लाख ९६ हजार ९३० मते मिळाली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर शरद पवार यांची राष्ट्रवादी असून त्यांना ७२ लाख ८७ हजार ७९७ मते मिळाली आहेत.
तसेच पाचव्या क्रमांकावर ठाकरे यांची शिवसेना असून त्यांना ६४ लाख ३३ हजार ०१३ मते मिळाली आहेत.दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर असून त्यांना ५८ लाख १६ हजार ५६६ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त मते मिळाली आहेत.कारण त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत खूप जास्त जागा लढविल्या होत्या.
तर अजित पवारांनी कमी मात्र निवडक व हमखास निवडून येणाऱ्या जागांवर उमेदवार दिले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १४ लाख ७१ हजार २३१ मते कमी मिळवूनही त्यांचे जास्त उमेदवार जिंकून आले.तसेच शिंदेंच्या शिवसेनेने मात्र ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा फक्त जागांच्या बाबतीतच नाही तर मतांच्याबाबतीतही मोठी आघाडी घेतली आहे.शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या सेनेपेक्षा १५ लाख ६३ हजार ९१७ जास्त मिळवली आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा