Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election : सिन्नर विधानसभा मतदारसंघात ७४ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election : सिन्नर विधानसभा मतदारसंघात ७४ टक्के मतदान

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी (दि.20) 73.85 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येथे तीन लाख 23 हजार 468 मतदार अहे. त्यापैकी 2 लाख 38 हजार 878 मतदारांनी मतदान केले. त्यात 1 ला 27 हजार 370 पुरूष मतदारांचा समावेश आहे. तर 1 लाख 111 हजार 508 महिलांनी मतदान केले.

- Advertisement -

विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदय सांगळे यांच्यासह 12 उमदेवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये बंद केले. सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. बोचरी थंडी असली तरी मतदानासाठी शहरासह ग्रामीण भागात दिवसभर रांगा लागून होत्या. दुपारी काही प्रमाणात मतदान मंदावले. मात्र, 4 वाजेनंतर पुन्हा मतदानाने वेग घेतला.

अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात महिलांचा उत्साह चांगला दिसत होता. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. एक-दोन अपवाद वगळता वोटिंग मशीन बिघडण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत. मतदान केंद्राबाहेर किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. शहरात मतदान केंद्राच्या बाहेर लावलेल्या बूथवर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी होती.

महायुती व महाविकास आघाडीचे बूथ जवळपास संपूर्ण मतदारसंघात दिसत होते. इतर अपक्षांचे बूथ कुठे बघायला न मिळाल्याने ते निवडणूक रिंगणातून गायब झाल्याचीच चर्चा होत होती. वडांगळी, वावी, देवपूर, पंचाळे, पांगरी, नांदूरशिंगोटे, ठाणगाव, डुबेरे, सोनांबे, नायगाव, दापूर, दोडी भागात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मतदान केल्यानंतर आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला गेले की नाही हे कळावे यासाठी 5-7 सेकंदासाठी चिठ्ठी आपल्या नजरेस पडते आणि त्यानंतर व्ही. व्ही. पॅटमध्ये जमा होते. त्यानंतरही काही सेकंद मतदान यंत्रावरील उमेदवारासमोरचा दिवा लागलेला राहत असल्याने मतदार उशिरा तेथून बाहेर पडत होते. त्यामुळे मतदानाला वेळ लागत असल्याने अनेक मतदारांना तास-तासभर रांगेत उभे राहावे लागत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...