Friday, October 18, 2024
Homeराजकीयकोकणात भाजपला मोठा धक्का! बडा नेता हाती घेणार मशाल

कोकणात भाजपला मोठा धक्का! बडा नेता हाती घेणार मशाल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासाघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोठी इनकमिंग पाहायला मिळणार आहे. कोकणातील भाजपचा एक मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे.

माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजन तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला यानंतर ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (Shivsena UBT) प्रवेश करणार आहेत.

राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत होईल असे चित्र पाहायला मिळू शकते.

दरम्यान भाजपचे सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख राजन तेलीनी भाजप सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यानंतर आता त्यांनी सावंतवाडीतील आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि बॅनर हटवले आहे. त्याठिकाणी आता स्वर्गिय बाबासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो कार्यालयात लावण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या