Tuesday, October 22, 2024
HomeनाशिकPolitical Special : नाशिक मध्यसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच

Political Special : नाशिक मध्यसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच

विद्यमान भाजप आमदार फरांदे प्रतीक्षेतच; मुंबईत बैठक

नाशिक | Nashik

मध्य नाशिकच्या ( Nashik Central Constituency) जागेसाठी आता महायुतीतील (Mahayuti) भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP and Shivsena) स्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे विद्यमान भाजप आ. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते वेटिंगवर असून आता दोन्ही सहकारी पक्षांनी देखील मध्यवर दावा केल्याने जागा कोणाला सुटते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तशीच परिस्थिती महा महाविकास आघाडीत देखील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

येथे तीनऐवजी शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसमध्ये (Shivsena and UBT) तणाव आहे. तरी मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गट मध्य सोडायला तयार नसल्याने पेच वाढला आहे. दरम्यान, आज सोमवारी (दि. २१) मध्य नाशिक मतदारसंघासाठी मुंबईत जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. भाजप आ. देवयानी फरांदे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नाशिकमधील (Nashik) पक्षाचे काही बड नेते व सुमारे २० पेक्षा जास्त मानी नगरसेवक देखील होते.

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

तर शिवसेना शिंदे गटही या मतदारसंघासाठी आग्रही असून उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे कळते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कसैील कडूनही मध्य नाशिकची जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरु आहे. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यासाठी इच्छुक आहे. भाजप नाशिक मध्यची जागा शिवसेना शिंदे गटाला देऊन त्या बदल्यात दुसरी जागा घेऊ शकते. अशी दिवसभर चर्चा होती. त्यात सेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुंबईत (Mumbai) असल्याने त्या चर्चांना बळ मिळत होते.

हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

दोन दिवसांत निर्णय

दोन दिवसांपूर्वी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून त्यात नाशिक पूर्वमधून विद्यमान आ. अॅड. राहुल ढिकले व पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र नाशिक मध्यची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे सलग दोन वेळा आमदार असलेल्या देवयानी फरांदे वेटींगवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात मध्य नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

आघाडीतदेखील तणाव

महाविकास आघाडीतही (Mahavikas Aaghadi) कलह वाढत असून खा. संजय राऊत मध्यच्या जागेसाठी माघार घेण्यास तयार नसल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरण्याची घटिका जवळ आली असताना तोडगा निघत नसल्याचे पहायला मिळत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या