Saturday, October 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…

Ajit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…

नाशिक | Nashik

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपावर चर्चा सुरु असून येत्या एक ते दोन दिवसांत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांकडून मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) पहिली सभा पार पडली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे २०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र,मागील वर्षी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांचे क्रॉस व्होटिंग झाले होते. त्यामुळे आमदार खोसकर हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आगामी विधानसभेत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोसकरांची काँग्रेसमध्ये चलबिचल होत होती. त्यानंतर खोसकरांनी सोमवार (दि.१४) रोजी मुंबईत देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. यानंतर आज अजित पवारांची त्र्यंबकेश्वर येथे हिरामण खोसकर यांच्या समर्थनार्थ जनसन्मान यात्रा पार पडली. या यात्रेच्या माध्यामातून अजित पवारांनी प्रत्यक्षरित्या निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणादरम्यान अप्रत्यक्षपणे आमदार हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची घोषणा करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

हे देखील वाचा : मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले! राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर

यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ” दोन-तीन दिवसांपूर्वी हिरामण खोसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला. यानंतर आता इतरांचा होणार आहे.आता निवडणुकीचा काळ असून काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते. अनेक लोक आमच्याकडे येतात, खोसकर देखील कामानिमित्त माझ्याकडे यायचे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. महायुती, महाविकास आघडी, मनसे, हौशे नवशे गवसे सर्व उभे राहतील, पण तुम्ही महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या, असे म्हणत अजित पवारांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली.

हे देखील वाचा : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, “आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी चाललो असून एकमेकांच्या बाबतीत आम्ही सन्मान ठेवतो. जाती-पाती आम्ही मनात नाही. कधी काही वाचाळवीर काही तरी बोलतात ते आपल्या महाराष्ट्रला न पटणारे असते. आपण त्याचा त्याच वेळी निषेध करतो. ज्यांनी प्रवेश केला त्यांना आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, असे होऊ देणार नाही. काहींनी आता काढले की, लाडकी बहिण योजना बंद केली, योजना बंद केलेली नाही. आम्ही केंद्रातून निधी आणू. आम्ही शेतकऱ्यांना आणि कोणालाच वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधक सत्तेत आले तर योजना बंद पाडतील. राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी थांबावावी. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे विरोधक म्हणतात. पण मी अर्थमंत्री आहे, मला माहिती आहे. सत्तेत येण्यासाठी राज्याची बदनामी करू नका”, अशी टीकाही यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर केली.

हे देखील वाचा : राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा, विजया रहाटकर यांची नियुक्ती

तसेच आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो, दोन भावंडं वेगळी झाले तसे ते झाले. तो १९९९ चा काळ होता. अलीकडच्या काँग्रेसने हिरामण खोसकर यांना अनेकवेळा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मला जिथे मत द्यायला सांगेन, तिथे मत देणार असे खोसकर बोलले होते. आम्ही त्यांना काहीही सांगितले नाही. हिरामण खोसकर यांचा स्वभाव सर्वांना मिसळून राहणारा आहे. विकासाच्या कामासाठी ते आमच्याकडे येत होते. आम्ही ५४ आमदार निवडून आलो होतो, पण त्यात ५५ वे नाव हिरामण खोसकर यांचे होते, असेही अजित पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा : हिजबुल्लाहचा मोठा पलटवार! इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले जातील

काल नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आज अजित पवारांनी आपल्या भाषणात या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या परतीचा पाऊस पडत असून भात पिकांचे मोठे नुकसान होतं आहे. बऱ्याच पिकांच्या नुकसान होतं आहे. लोक म्हणत आहेत तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा, जरी आचारसंहिता असली तरी नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांना नक्की सांगितले जाईल, पंचनामे केले जातील, असे अजित पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या