Monday, October 21, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; 'यांना' मिळाली संधी

मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत भाजपने बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. यासोबतच सदर यादीत काही खास नावे देखील आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

पहिल्या यादीत भाजपने नागपूर दक्षिणमधून-देवेंद्र फडणवीस, कामठी-चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूड-चंद्रकात पाटील, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, नंदूरबार- विजयकुमार गावित, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिमतून सीमा हिरे, चांदवड-राहुल आहेर, बागलाण-दिलीप बोरसे, जिंतूर-मेघना बोर्डीकर,चिखली-श्वेता महाले, खामगाव-आकाश फुंडकर, जळगाव (जामोद)-संजय कुटे, अकोला पूर्व-रणधीर सावरकर, देवली-राजेश बकाने, नागपूर पश्चिम-मोहन मते, धुळे शहर-अनुप अग्रवाल, भोकरदन-संतोष दानवे, सिंदखेडा-जयकुमार रावल, शिरपूर-काशीराम पावरा, भुसावळ-संजय सावकारे, चाळीसगाव-मंगेश चव्हाण, शिर्डी-राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत जामखेड-राम शिंदे, राहुरी-शिवाजीराव कर्डिले, शेवगाव-मोनिका राजळे, श्रीगोंदा-प्रतिभा पाचपुते यांचा समवेश आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चेला उधाण

तर भोकरदन-श्रीजया चव्हाण, घाटकोपर पश्चिम-राम कदम, जामनेर-गिरीश महाजन, कणकवली-नितेश राणे, सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख, कुलाबा-राहुल नार्वेकर, परतूर-बबनराव लोणीकर, गंगापूर-प्रशांत बंब, छ.संभाजीनगर पूर्व-अतुल सावे, कोल्हापूर दक्षिण-अमल महाडिक, मलबार हिल- मंगलप्रभात लोढा, जळगाव शहर-सुरेश भोळे, रावेर- अमोल जावळे, दौंड-राहुल कुल, मुरबाड-किसन कथोरे, राळेगाव-अशोक उईके, ठाणे-संजय केळकर, डोंबिवली-रवींद्र चव्हाण, कांदिवली पूर्व-अतुल भातखळकर, हिंगोली-तानाजी मुटकुळे, बदनापूर-नारायण कुचे, मिरज-सुरेश खाडे, तुळजापूर-राणा जगजितसिंह पाटील, गोरेगाव-विद्या ठाकूर, नालासोपारा-राजन नाईक, कल्याण पूर्व-सुलभा गायकवाड, फुलब्री-अनुराधा चव्हाण, ऐरोली-गणेश नाईक, विलेपार्ले-पराग आळवणी, निलंगा-संभाजी पाटील निलंगेकर, अचलपूर-प्रवीण तायडे, हिंगणा समीर मेघे, वांद्रे पश्चिम-आशिष शेलार, सातारा-शिवेंद्रराजे भोसले, नागपूर पूर्व-कृष्ण खोपडे यांना उमेदवारी मिळाली आहे.

हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत

तसेच चिमूर-बंटी भांगडिया, आर्मोली-कृष्णा गजबे, गोंदिया-विनोद अग्रवाल, तिरोरा-विजय रहांगडाले, आर्मोली – कृष्णा गजबे, वाणी-संजीवरेड्डी बोडकुरवार, किनवट-भीमराव केरम, नायगाव -राजेश पवार, मुखेड-तुषार राठोड, यवतमाळ-मदन येरवर, वडाळा-कालिदास कोलंबकर, मालाड पश्चिम-विनोद शेलार, अक्कलकोट-सचिन कल्याणशेट्टी, भिवंडी पश्चिम-महेश चौगुले, हिंगणघाट-समीर कुणावार, वर्धा-पंकज भोयर, पार्वती-माधुरी मिसाळ, शिवाजीनगर-सिद्धार्थ शिरोळे, भोसरी-महेश लांडगे, चिंचवड-शंकर जगताप, पनवेल-प्रशांत ठाकूर, सायन कोळीवाडा-कॅप्टन आर तमिळ सेल्वम, अंधेरी पश्चिम-अमित साटम, चारकोप-योगेश सागर, दहिसर-मनीषा चौधरी, बेलापूर-मंदा म्हात्रे, केज-नमिता मुंदडा, ओसा-अभिमन्यू पवार, मान-जयकुमार गोरे, कराड-अतुल भोसले, इचलकरंजी-राहुल आवाडे, सांगली-सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या