Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही"; शरद पवारांचा निर्धार

Sharad Pawar : “सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) प्रत्येक पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असून राजकीय नेत्यांकडून सभांत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महायुतीच्या (Mahayuti) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) खासदार राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता धाराशिवमधील प्रचारसभेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी “सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही”, अशा शब्दात महायुतीला इशारा दिला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “काही लोकांनी आमची साथ सोडली. भाजपाच्या पंक्तीत गेले. अगोदर सांगत होते विकासासाठी गेलो, पण आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो, एक प्रकारे लाचारीचे दर्शन घडले आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. तुम्ही मला या वयातही फिरतो म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही”, असा निर्धार यावेळी खासदार शरद पवार यांनी केला.

हे देखील वाचा : Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”

पुढे ते म्हणाले की, लोकसभेला (Loksabha) भाजपने (BJP) संविधान बदलण्यासाठी ४०० पारची घोषणा केली. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला. तुम्ही-आम्ही एकत्र झालो आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी ३१ खासदार निवडून आणले. तुम्ही राज्यघटना वाचवायचे काम केले. ही विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना (Candidates) प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही शरद पवारांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...