मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीची २८८ जागांवर पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण झाली. तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यात चर्चा होईल. तिढा असलेल्या जागांबाबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यासाठी तीनही पक्षांकडून एकत्र सर्वेक्षण केले जाईल.
३० ते ३५ जागांमध्ये दोन ते तीन पक्ष आग्रही असल्याने यातल्या जागा दुसऱ्या टप्प्यात चर्चेसाठी घेतल्या जातील. काही जागांमध्ये अदलाबदल होणार आहेत. महाविकास आघाडी लवकरच नेत्यांचे दौरे आणि संयुक्त मेळावे जाहीर करणार आहे.
महाविकास आघाडीतील पक्षांनी २०१९ ला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा त्या पक्षालाच ठेवण्यावर चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. काही जागांमध्ये अदलाबदल केला जाणार आहे. साधारणपणे ३० ते ३५ जागांमध्ये दोन किंवा तीन पक्ष आग्रही असल्याने यातील जागा दुसऱ्या टप्प्यात चर्चेसाठी घेणार आहे. महाविकास आघाडी लवकरच नेत्यांचे दौरे आणि संयुक्त मेळाव्याबद्दल कार्यक्रम जाहीर करणार आहे. विद्यमान सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे.
हे हि वाचा : शरद पवार गटाचा श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार फायनल?
जागावाटप बैकठीवर खा. संजय राऊत म्हणाले, सलग चार दिवस महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते जागा वाटपासाठी बसलो यातलं गांभीर्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जो जिंकेल तो त्या जागेवर लढेल हे आमचं सूत्र आहे. २८८ जागांवरती नजर देताना प्रत्येक घटकाचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. चार दिवस बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात.
पुन्हा बसावं लागतं आणि काही कॉल घ्यावे लागतात, प्रत्येकाची स्वातंत्र मत असतात, पण हे जागा वाटप शांततेत आणि सहज पार पडेल. आम्ही कोणताही फॉर्म्युला समोर ठेवून निवडणुका लढत नाही, लोकसभेला कुठलाही फॉर्मुला नव्हता. याच्या वाटेला ज्या जागा आल्या त्या आम्ही लढल्या. विधानसभेला सुद्धा आम्ही अशाच प्रकारे कुठल्याही फॉर्मुला विना निवडणूक लढू. आघाडीच्या जागावाटप आम्ही एवढ्या जागा लढवू तेवढ्याच जागा लढू असं होऊन होणार नाही.
हे हि वाचा : आमदार काळेंचे गुन्हेगारांना बळ?
थोरातांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर…
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर त्यांच्या पक्षाने तसेच जाहीर केलं पाहिजे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तीन पक्षांचे बळ मिळून ठरेल. आघाडी उत्तमपणे कोण चालवू शकतो आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाचा कोणता चेहरा मान्य आहे, यावर चर्चा होऊन निर्णय होईल. जशी जागा वाटपात रेस नाही तशी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सुद्धा रेस नाही. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा कोणताही सूत्र ठरलेलं नाही आणि ठरणारही नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
हे हि वाचा : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर
‘वंचित’चे शेवगावसह ११ उमेदवार जाहीर
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डीतून प्रा. किसन चव्हाण यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील, तर सिंधखेडा राजा येथून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली येथून डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिणमधून फारुक अहमद, लोहा येथून शिवा नरंगले, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे, खानापूर येथून संग्राम कृष्णा माने यांची वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे.