Thursday, October 24, 2024
HomeराजकीयMaharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या 'या' दिग्गज नेत्यांनी...

Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मंगळवार (दि. २२ ऑक्टोबर) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahavikas and Mahayuti) जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. अशाच आज २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याने उमेदवारांनी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत अर्ज भरण्याला प्राधान्य दिले आहे.सर्वच राजकीय पक्षांच्या काही प्रमुख उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : माजी आमदार धनराज महाले उद्या उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीमध्ये बंडखोरी?

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. याशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव, रत्नागिरीतून राजन साळवी, ठाणे राजन विचारे , यांनी उमेदवार अर्ज भरला. तसेच इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष व उमेदवार जयंत पाटील, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि मुंब्रा-कळव्यातून प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, कागलमधून समरजीत घाटगे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, तासगाव-कवठे महाकांळतून रोहित आर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत; हिरे, बडगुजर, पाटील निवडणूक मैदानात

तर महायुतीमधील (Mahayuti) भाजपकडून कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील, मलबार हिल मंगलप्रभात लोढा, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांनी अर्ज भरला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, अमळनेर अनिल पाटील, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील, परळीतून धनंजय मुंडे, मावळमधून सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंगोलीतून संतोष बांगर, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील, जालना अर्जुन खोतकर, यांच्यासह आदी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या