Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात 'या' तारखेपासून प्रचाराचा...

Maharashtra Assembly Elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून प्रचाराचा धडाका

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मंगळवार (दि. २२ ऑक्टोबर) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahaivkas Aaghadi and Mahayuti) जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांचा (Candidate) प्रचार कसा करायचा याचेही नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रातील संभांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महाराष्ट्रात आठ दिवस म्हणजेच येत्या ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सभा होणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विभागवार सभा घेणार असून या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान मोदी हे १४ नोव्हेंबरपासून विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. मात्र, या कालावधीतही जास्तीत जास्त सभा कशा घेतल्या जातील, याकडे महायुतीचा कल असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत; हिरे, बडगुजर, पाटील निवडणूक मैदानात

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांसाठी (Constituency) मतदान (Voting) पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल (Result) जाहीर होणार आहे. तर विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार असून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडताना दिसणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या