Friday, November 22, 2024
HomeराजकीयPolitical Special : इगतपुरी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत टक्कर

Political Special : इगतपुरी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत टक्कर

इगतपुरी | वाल्मिक गवांदे | Igatpuri

आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात (Igatpuri-Triambakeshwar Constituency) आता विधानसभेच्या निवडणुकीचे (Election) बिगुल फुंकले गेले आहे. त्यातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांच्यावर ठेवल्यानंतर आपल्याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झाल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रबादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आता काँग्रेसकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली प्रबळ दावेदारी सांगितली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

मागील इतिहास पाहता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला आमदार (MLA) पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येत नाही. याला अपवाद फक्त निर्मला गावित या २००९ व २०१४ ला सलग दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. मात्र डबल आमदार होण्याचा मान पुन्हा मिळत नाही. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात खरी लढत होणार आहे. सर्व पक्षांत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले आहे. यातच अनेक आमदारांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हात दाखवत हाती घड्याळ बांधले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

हे देखील वाचा : Sanjay Raut : ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चेला उधाण

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) ही जागा काँग्रेसची असल्याने काँग्रेसकडून उषा बेंडकोळी, अनिता घारे असे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, रवींद्र भोये इच्छुक असून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच त्यांना ठाकूर समाजाचा मोठा पाठिंबा असून ठाकूर समाज मेंगाळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याने मेंगाळ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागत आहेत. तर रवींद्र भोये यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. तसेच माजी आमदार निर्मला गावित या घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत

काँग्रेसकडून निर्मला गावित (Nirmala Gavit) यांच्यासह दोन तरुण उमेदवार पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव आणि काँग्रेसचे युवक जिल्हा चिटणीस वैभव ठाकूर हे गेल्या काही महिन्यांपासून मतदारांच्या भेटीगाठी घेत असून तेही तिकिटाच्या स्पर्धेत आहेत. गोपाळ लहांगे यांनी मागील आठवड्यात आदिवासी मेळावा घेत एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले होते. मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश } चेन्नीथला, आदिवासी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रभारी निजामुद्दीन सय्यद, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, राहुल दिवे, आकाश छाजेड या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र तिकीट नेमके कोणाला मिळेल हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी सर्वात जास्त निधी आणून विकासकामांच्या भूमिपूजनाचे फलक इगतपुरी शहरासह तालुक्यात दिसून येत आहेत. कारण मागील इतिहास पाहता पक्ष सोडल्यानंतर विद्यमान आमदारांना या मतदारसंघाने नाकारल्याचे अधोरेखित आहे. त्यातच जर एखादा बलाढ्य अपक्ष उमेदवार या लढतीत उतरला तर यंदा या मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता असून तसे चित्रसुद्धा पाहावयास मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी या पक्षांनीही (Parties) निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मात्र त्यांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या