नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील चारपैकी एक असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे (Nashik Central Assembly Constituency) चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे महायुतीकडून (Mahayuti) शहरातील दोन जागांवर विद्यमान आमदारांना (MLA) तिकीट जाहीर करण्यात आले, मात्र, मध्यच्या भाजप आ. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांचे नाव त्या यादीत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे या जागेवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद सुरु असल्याने त्यांच्याकडूनही कोणालाही अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सस्पेन्स कायम आहे.
हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
इच्छुकांच्या गर्दीमुळे पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठांची डोकेदुखी वाढली असून, तिकिट कोणाला सोडायचे यावर खलबते सुरु झाली आहे.मध्य नाशिक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गिते यांच्यासह संजय चव्हाण आणि इतरांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून (Congress) २०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील यांच्यासह पक्षातील माजी नगरसेवक राहुल दिवे, गुलजार कोकणी, हनिफ बशीर आदींनी आमदारकीची मोर्चेबांधणी केली आहे.
हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यात भाजपला मोठे भगदाड; नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे
२००४ ते २००९ पर्यंत नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेसच्या शोभा बच्छाव आमदार होत्या, तर २००९ मध्ये मध्य स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर झालेल्या निवडणुक मनसेनाकडून वसंत गिते हे निवडून आले होते. २०१४ पासून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या देवयानी फरांदे या मतदारसंघाच्या आमदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे आहे.२०१९ मध्ये भाजप व शिवसेना यांची युती विरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असा संघर्ष होता तर आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष राहणार आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह
दरम्यान, मध्यसाठी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aagahdi) काँग्रेस व ठाकरे गटाने या जागेसाठी दावा केल्यामुळे मध्य नाशिकची जागा कोणाला सुटणार, याकडेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ दलित- मुस्लीम आदी मतांवर काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. त्यामुळे काँग्रेसने दावा केल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मतदानातून मध्यमधून मिळालेले भरघोस मतदान पाहता ठाकरे गटाने देखील दावा सांगितला आहे. मात्र, कोणाचीही उमेदवारी जाहीर न झाल्याने सस्पेन्स कायम आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा