Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : बंडखोरांना थोपवण्याचे आव्हान

Political Special : बंडखोरांना थोपवण्याचे आव्हान

नाशिक | मानस जोशी | Nashik

राज्यात निवडणुकांचे विधानसभेच्या (Vidhansabha Election) बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. राज्यातील दोन्ही प्रमुख महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटप आणि संभाव्य उमेदवारांच्या (Candidate) नावाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांची विधानसभानिवडणूक लढवून आमदार होण्याची इच्छा आहे, त्यामुळे पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष सहभागी असल्याने इच्छुकांना त्यांच्या इच्छेनुसार पक्षांतून अधिकृत उमेदवारी देतानाही पक्षांना अडचणी येत आहेत.अशातच नाराज झाले ले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारीसाठी बंडखोरी करतात. त्यामुळे राजकीय पक्षांसमोर इच्छुक उमेदवारांची ही बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

सध्या राज्यात राजकीय समीकरणांनी जोर धरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi and Mahayuti) कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार त्यावरून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्यात पक्षांतराचे प्रमाण गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती, महाविकास आघाडी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंची मनसेना लढणार आहे. तसेच माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष यांची यापूर्वी घोषणा झालेली महाशक्ती परिवर्तन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उत रली आहे. माजी मंत्री आणि निवडणूक जाहीर झाल्यावर महायुतीबाहेर पडलेले महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षसुद्धा आता स्वबळावर लढणार आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आणि एमआयएमसुद्धा निवडणुकीत उमेदवार उतरवणार असल्याने यावेळची निवडणुकीत अधिकच कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे

हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बहुतांश बदलली आहे. महायुतीला राज्यात अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही, तर महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त जागा प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील तीन पक्षांपैकी एकाच पक्षाला मतदारसंघ सुटेल व त्याद्वारे एकाच उमेदवाराला अधिकृत उमेदवारी मिळणार असल्याने ज्या पक्षांसाठी मतदारसंघ सुटणार नाही त्या पक्षांतील इच्छुक उमेदवारांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. अनेक इच्छुकांनी अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उमेदवारीच्या मुद्यावरुन बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत

… म्हणून उमेदवारी याद्या जाहीर करायला उशीर?

महायुती व महाविकास आघाडी एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत असल्याने आणि त्याचवेळी दोघांचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सगळ्यांच्याच उमेदवार याद्या अडल्या आहेत. महायुती व मविआमध्ये किमान २५ ते ३० मतदारसंघ असे आहेत की, जिथे पहिले समोरच्यांनी उमेदवारी जाहीर करण्याची वाट पाहिली जात आहे. उमेदवारी नाकारल्याने आपल्याकडचे इच्छुक दुसरीकडे जातील, अशी शंका महायुती व मविआ या दोघांनाही वाटत आहे. त्यामुळेच उमेदवार जाहीर करण्याचे लांबणीवर टाकले जात असल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या