Wednesday, November 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : धनंजय महाडिकांच्या 'त्या' विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, "१५००...

Sanjay Raut : धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “१५०० रुपयात मतं…”

नाशकात वंचित आणि भाजपला बसणार मोठा धक्का, 'हे' बडे नेते करणार पक्षप्रवेश

नाशिक | Nashik

भाजपचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी एका प्रचारसभेत बोलतांना “लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या (Congress) रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करू”, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून महाडिक यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, “महिलांना (Women) मदत व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी लाडकी योजना सुरु केलेली नाही. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहे. मतदान होईपर्यंत ही योजना आहे. त्यामुळेच अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. महिलांना दबावाखाली आणले जातं आहे. त्यामुळे हा एकप्रकारे १५०० रुपयांत मत विकत घेण्याचा प्रकार आहे”, अशी टीका त्यांनी केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) पंचसुत्रीनुसार आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु करणार आहे. त्यानुसार त्यांना तीन हजार रुपये दिले जातील. पण आम्ही त्यांचे फोटो काढणार नाही. खरं तर या योजना मत मिळवण्यासाठी नसतात. महिलांच्या विकासासाठी या योजना असतात. आज रुपये १५०० रुपये खूप मोठी रक्कम नाही. आज १४०० रुपयांना फक्त सिलिंडर येते. म्हणून आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजार रुपयांची करत आहोत. निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांकडून अशा धमक्या महिलांना दिल्या जातील. मात्र, महिला याकडे दुर्लक्ष करत असून त्यांना माहिती आहे की हा तीन महिन्यांचा (Three Months ) खेळ आहे. त्यांना महालक्ष्मी योजनेचीच मदत मिळणार आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.

नाशकात वंचित आणि भाजपला बसणार धक्का

येत्या १५ नोव्हेंबरला नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी वंचितचे पवन पवार आणि भाजपचे विक्रम नागरे यांच्यासह काही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या