Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रShivsena (UBT) Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकरी ते ...

Shivsena (UBT) Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकरी ते मोफत शिक्षणासह केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी महायुतीने (Mahayuti) १० मोठ्या घोषणा केल्या होत्या. यात लाडकी बहिण योजनेतील रकमेच्या वाढीसह शेतकऱ्यांसाठी विविध घोषणांचा समावेश होता. त्यानंतर काल महाविकास आघाडीने (Mahavikas Aagahdi) आपली पंचसूत्री जाहीर केली. यात सरकार आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत ३००० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली. यानंतर आज मविआतील घटक पक्ष असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेने आज(गुरूवारी) आपला वचननामा प्रकाशित केला आहे.यामध्ये त्यांनी मुंबईकरांच्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

- Advertisement -

यावेळी वचननामा जाहीर करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काल मविआची सभा यशस्वीरीत्या पार पडली. आम्ही मतं मागायची आणि लोकांनी द्यायची असं मला पटत नाही. लोकांनी आम्हाला का मतं द्यायची. काल आम्ही पंचसूत्री जाहीर केली. त्यानंतर काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होईलच पण काही बारीक-सारी गोष्टी अशा आहेत. ज्या शिवसेनेच्या वचननाम्यात आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच २०२० ची पालिका निवडणूक होती. तेव्हा वचननामा जाहीर केला होता. मुंबईसाठी सागरी मार्गाचे आश्वासन दिले होते. मला अभिमान आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवले.मालमत्ता कर माफ करणार जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले. शिवभोजन थाळी सुरू केली. हा वचननामा दोन प्रकारात असेल. फार काही वेगळा वचननामा नाही. पण थोडी फार काही वचने आहेत ती दिली जातील. मविआच्या इतर पक्षांना देखील मान्य आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “धारावीत आम्ही वित्तीय केंद्र उभारु. तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करू. गृहनिर्माण धोरण तयार करू. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि गावठाण त्यामध्ये कोळी बांधव आले काही गावठाण यांच्याकडे आता सरकारची वाकडी नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकास किंवा डेव्हलपमेंट करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय ते सगळं एकत्रित करायचे त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला त्याच्या घशात घालायची असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. पहिला प्रथम त्यांनी केलेला जीआर आहे तो रद्द करू कोळीवाड्यांचे अस्तित्व यांची ओळख हे आम्ही कदापी पुसू देणार नाही. या सर्वांना मान्य होईल असाच विकास आम्ही त्या ठिकाणी करू”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंच्या वचननाम्यात काय?

संस्कार
प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.

अन्नसुरक्षा

शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.

महिला

महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.
प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४४७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार.
अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.

आरोग्य

प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.

शिक्षण

जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.

पेन्शन

सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.

शेतकरी

‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.

वंचित समूह

वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.

मुंबई

धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.
मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.

उद्योग

बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार.
निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या