सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
महाविकास आघाडी व महायुतीच्या (Mahavikas Aaghadi and Mahayuti) अधिकृत उमेदवारांनी आज (दि.२४) रोजी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत आपले उमेदवारी अर्ज (Candidature Form) दाखल केला. महाविकास आघाडीकडून उदय सांगळे यांनी तर महायुतीकडून विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही उमेदवारांसोबत मोजकेच नेते उपस्थित होते.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे (Uday Sangle) यांनी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता खासदार राजाभाऊ यांच्यासोबत जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांच्याकडे उमेदवारी दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दाखल केलेल्या सांगळे यांच्या अर्जावर खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांची सूचक म्हणून सही होती. या अर्जासोबत पक्षाचा ए.बी. फॉर्म जोडलेला नव्हता. यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲड. भगीरथ शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. संजय सोनवणे, राष्ट्रवादीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, दत्ता गोळेसर, दीपक सुडके उपस्थित होते.
हे देखील वाचा : Nashik Political : नांदगावमध्ये महायुतीत बंडखोरी; समीर भुजबळांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
तर महायुतीचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केवळ चार सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपले दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारती यांच्याकडे दाखल केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा (Ajit Pawar NCP) ए.बी. फॉर्म जोडत पहिला अर्ज आमदार कोकाटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी भाजपच्या उद्योग महाआघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे, शहाचे सरपंच संभाजी जाधव, भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष कदम उपस्थित होते. या अर्जावर सूचक म्हणून संभाजी जाधव, जयंत आव्हाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, वावीचे सरपंच विजय काटे यांनी सह्या केल्या होत्या. तसेच आमदार कोकाटे यांनी अपक्ष म्हणूनही एक अर्ज दाखल केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा