Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

येवला | योगेंद्र वाघ | Yeola

येवला मतदारसंघात (Yeola Assembly Constituency) येवला तालुका आणि निफाड तालुक्यातील लासलगांव आणि देवगांव ही महसूल महसूलम मंडळे यांचा समावेश आहे. प्रारंभी येवला मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, २००४ मध्ये सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात छगन भुजबळ येवल्यात आले आणि प्रस्थापित झाले. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे येवल्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या चार पंचवार्षिकपासून भुजबळ येवल्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावरून मनोज जरांगेंशी झालेल्या वादांवरुन आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे भुजबळ राज्यभर चर्चेत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप; कुणाचा आहे समावेश?

निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशा येथील राजकीय घडामोडी वाढल्या असून, राजकीय समीकरणही बदलत आहेत.त्यामुळे सलग चार निवडणुकांमध्ये विकास अस्त्राने मराठा उमेदवाराचा पराभव करून विजयाचा चौकार मारणाऱ्या भुजबळ यांना यंदाची निवडणूक (Election) तशी सोपी नाही. २००४ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना ७९ हजार ३०६ तर पाटील यांना ४३ हजार ६५७ मते मिळाली होती. २००९ मध्ये भुजबळ यांनी १ लाख ६ हजार ४१६ मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना या ५६ हजार २३६ मतें मिळाली होती.२०१४ मध्ये १ लाख १२ हजार मिळवत शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत ६६ हजार ३४५ मतें मिळाली. तर २०१९ मध्ये भुजबळ यांनी पुन्हा संभाजी पवार शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना १ लाख २६ हजार २३७ मते मिळाली. तर पवार यांना ६९ हजार ७१२ मते मिळाली होती.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

येवला मतदारसंघ लोकसभेला (Loksabha) भाजपसोबत असतो. तर विधानसभेला राष्ट्रवादीबरोबर असतो हे आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांसह शिवसेना सोबत नसतानाही भाजपची मते वाढल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मतदारसंघातून १३,२०५ मताधिक्क्य मिळाले. महायुतीत येवल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला जाईल आणि छगन भुजबळ उमेदवार राहतील हे निश्चित असल्याने भुजबळ यांचा प्रतिस्पर्धी कोण? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.महाविकास आघाडीत येवल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला जाईल असे असताना राष्ट्रीय काँगेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षानेही येवल्याच्या जागेवर दावा केला आहे. सद्यातर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे उमेदवारीसाठी गर्दी दिसून येत आहे. अॅड. माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, उषाताई शिंदे, सानीया होळकर, गोरख पवार, सचिन आहेर आदी प्रमुख इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखतीही दिल्या आहेत.

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आपले काका शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. इतर इच्छुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अॅड. समीर देशमुख, दत्ता चव्हाण, मनसेचे नरसिंह दरेकर या शिवाय अमृता पवार यांचेही नाव चर्चेत आहे.भागवत सोनवणे यांनी सोशल माध्यमावर नुकतीच आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येवल्यात उमेदवार देतात का याकडेही सर्वांचेच लक्ष लागून आहे. अनेक इच्छुकांनी जरांगे पाटील यांच्याकडेही उमेदवारीसाठी मुलाखती दिल्याच्या बातम्या आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्या नंतर इतर कोण कोण रिंगणात उतरते यावरच लढत कशी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या