Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावे…; अमित शाह...

Sanjay Raut : त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावे…; अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले

मुंबई | Mumbai
भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाल्याचे वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहे. तसेच या बातम्या जाणुनबुजून पेरल्या जात असून, अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आमचा पक्ष फोडला, आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह त्यांनी चोरले. त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावे”, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. अशा अफवा पसरवून कोणी लढणार असेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. कोणी सुपाऱ्या दिल्या याची बातमी आमच्याकडे आली आहे. आमचीही यंत्रणा आहे. एक वेगळं पेगासेस आमच्याकडे सुद्धा आहे. कोण कोणाकडून अफवा पसरवून घेतय, हे आमच्याकडे आहेत. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी आम्ही हात मिळवणी करणार नाही. भाजपशी हात मिळवणी करणे म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाशी हात मिळवणी करणे.

- Advertisement -

“काँग्रेस नेत्यांचा दावा असेल तर मला त्याचेही आश्चर्य वाटते. या शक्तींशी सर्वात जास्त संघर्ष शिवसेनेने केला आहे. आमचा पक्ष फोडला, आमचे सरकार पाडले, चिन्ह चोरले आणि महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला. जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाचे औलाद नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असावेत. एकतर त्यांनी बाप दाखवावा किंवा श्राद्ध घालावे,” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आमची लढाई महाराष्ट्राच्या शत्रूंविरोधात सुरु आहे. महाराष्ट्राला लुटणाऱ्यांविरोधात आम्ही लढत आहोत. शिवसेना अशा शक्तींविरोधात कधीही झुकणार नाही. ज्यांना देशाचं संविधान संपवायचे आहे. जे लोक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतात, त्यांच्याविरोधात आमचा लढा आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या