Saturday, November 16, 2024
Homeराजकीयविधानसभा अध्यक्ष नाना पटोले करोनामुक्त

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले करोनामुक्त

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना 4 सप्टेंबर रोजी करोनाची लागण झाली होती. करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करत दिली होती. दरम्यान नाना पटोले यांनी ट्वीटर वर रिपोर्ट शेअर करत करोनामुक्त झाल्याची बातमी शेअर केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, “आपण सर्वांनी केलेल्या प्रार्थनेमुळे आणि आशीर्वादामुळे मी आज कोरोना वर मात केलेली आहे.. आज माझी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या मी होम क्वारन्टीन आहे व या ठिकाणाहून माझे वर्क फ्रॉम होम सुरू आहेच. मी सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे.”

नाना पटोले मागील महिन्यात विदर्भामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. ‘विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली.’ असं ट्वीट करत काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनापूर्वी 2 दिवस विधानसभा अध्यक्षांचाच करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यात अधिवेशन होणार की नाही? असा काहींना प्रश्न पडला होता मात्र सार्‍यांच्याच कोरोना चाचण्या करून अवघ्या दोन दिवसांचं पावसाळी अधिवेधन पार पडले आहे. आता हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2020 मध्ये नागपूरात आयोजित करण्यात आलं आहे.

छगन भुजबळ ‘होम क्वारंटाईन’

राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास करोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या