Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : उष्माघाताने सात ते आठ श्रीसदस्यांचा मृत्यू

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : उष्माघाताने सात ते आठ श्रीसदस्यांचा मृत्यू

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना गौरवण्यात आलं. नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात भर दुपारी हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. 24 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 15 जण अत्यावस्थ असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मैदान गर्दीने भरले होते. कडक उन्हामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. अनेकांना चक्कर तसेचत ग्लानी आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अतिशय दु:खद घटना- मुख्यमंत्री

उष्माघाताने उपचार घेणार्यांना चांगल्यात चांगले उपचार मिळावेत यासाठी सूचना दिल्या आहेत. ही अतिशय दु:खद घटना आहे. घटना दुर्देवी आहे. मनाला वेदना देणारी अशी घटना आहे. या घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. जे उपचार घेत आहेत त्या सगळ्यांचा खर्च शासन करणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सात ते आठ लोकांचा मृत्यू झाला आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाबाहेर बोलताना सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या