Friday, November 15, 2024
HomeराजकीयBJP Maharastra : मविआच्या ‘जोडे मारो आंदोलना’ला आंदोलनातूनच उत्तर; भाजप कार्यकर्ते उतरले...

BJP Maharastra : मविआच्या ‘जोडे मारो आंदोलना’ला आंदोलनातूनच उत्तर; भाजप कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया असा मोर्चा महाविकास आघाडीने काढला.

- Advertisement -

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला गेला. यावेळी गेट वे ऑफ इंडिया परिसरात सरकारला जोडे मारो आंदोलन महाविकास आघाडीने केलं. या महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून देखील आंदोलन केले जात आहे.

राज्यभरामध्ये भाजपचे आंदोलन असणार आहे. नागपूरमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईमध्ये शहाराध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर रावसाहेब पाटील दानवे हे लातूरमध्ये, खासदार नारायण राणे हे सिंधुदुर्गामध्ये तर आमदार रवींद्र चव्हाण हे रत्नागिरीमध्ये भाजप आंदोलामध्ये सामील होणार आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

त्याचबरोबर ठाण्यात आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे, कराडमध्ये प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, पुण्यामध्ये युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, छत्रपती संभाजी नगरमध्ये मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आणि खासदार भागवत कराड तसेच .नाशिकमध्ये आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे हे आंदोलन छेडणार आहेत.

जळगावमध्ये आमदार राजू मामा भोळे आणि आमदार. मंगेश चव्हाण तसेच पालघरमध्ये खासदार हेमंत सावरा हे भाजपचे नेते आंदोलन करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मुंबईतील जोडे मारो आंदोलनाला भाजपकडून राज्यभरामध्ये आंदोलन करत उत्तर दिले जात आहे.

हे देखील वाचा : LPG Price Hike : महिन्याची सुरूवात महागाईने! गॅस सिलिंडर महागला… किती रुपयांनी वाढले दर?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या