Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections: भाजपचा बंडखोरांवर कारवाईचा बडगा; राज्यातील 'इतक्या' नेत्यांवर कारवाई

Maharashtra Assembly Elections: भाजपचा बंडखोरांवर कारवाईचा बडगा; राज्यातील ‘इतक्या’ नेत्यांवर कारवाई

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसह महाविकासाआघाडीत बंडखोरी पाहायला मिळाली. महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दोन नाही तर तब्बल ४० नेत्यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी केलल्या नेत्यांची यादीच भाजपाने जारी केली आहे.

भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पत्रकाखाली कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णींची स्वाक्षरी आहे. ३७ मतदारसंघांमधील पदाधिकारी आणि नेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोणा कोणावर कारवाई करण्यात आली?
धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील, जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे, अकोट – गजानन महाले, वाशिम – नागेश घोपे, बडनेरा – तुषार भारतीय, अमरावती – जगतीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद गडरेल, साकोली – सोमदत्त करंजेकर, आमगाव – शंकर मडावी, चंद्रपूर –ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली, अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल, नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, घणसांवगी – सतीश घाटगे जालना – अशोक पांगारकर गंगापूर – सुरेश सोनवणे, वैजापूर – एकनाथ जाधव, मालेगाव – कुणाल सूर्यवंशी, बागलान – आकाश साळुंखे, बागलान – जयश्री गरुड, नालासोपारा – हरिष भगत, भिवंडी – स्नेहा पाटील, कल्याण – वरुण पाटील, मागाठणे – गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकूर, अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल, नेवासा – बाळासाहेब मरकुटे, सोलापूर – शोभा बनशेट्टी, अक्कलकोट – सुनिल बंडकर, श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते, सावंतवाडी – विशाल परब

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत अनेकांची मनधरणी केली. अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांच्या शिष्टाईला यश आलं. मात्र बऱ्याच मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाने हे निलंबनाचे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या