मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर तसेच कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज, मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन (Online) जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याध्यर्थ्यांचे (Student) विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना (School) एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. या निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे
ऑनलाईन निकालानंतर दहावीच्या (10th Result) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
दरम्यान, यासाठी आवश्यक अटी शर्ती तसेच सूचना संकेतस्थळावर (Website) देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक १४ मे २०२५ ते बुधवार, दिनांक २८ मे २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहा
1.https://results.digilocker.gov.in
2. https://sscresult.mahahsscboard.in
3.http://sscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6.https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8.https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results