Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याLive Updates : रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झालीयं का? अंधारेंचा फडणवीसांना...

Live Updates : रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झालीयं का? अंधारेंचा फडणवीसांना खोचक प्रश्न

रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झाली आहे का, असा खोचक प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी भाजपला विचारला आहे. तसेच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजीनाम्याचे उदाहरण देत शिंदे-फडणवीसांना टोलाही लगावला आहे. रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झाली आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी निकाल पुन्हा वाचावा. भरत गोगावले यांची नियुक्ती चुकीची असल्याच त्यात म्हंटलं आहे, त्यांनी काढलेला व्हीप आणि व्होटींग देखील बेकायदेशीर आहे. यामुळे सरकार देखील बेकायदेशीर आहे. अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. ते एकत्र गेले नाहीत. थोडे-थोडे करुन गेले आहेत. याचिका दाखल केल्याचा ३ महिन्याच्या आत म्हणजे रिझनेबल पिरीड असतो. पक्ष आमचा आहे, असा दावा एकनाथ शिंदे करु शकत नाही. तो उद्वव ठाकरे यांचाच आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्दमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्दसुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली, बच्चू कडूंनी सांगितली तारीखमंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आमदार बच्चू कडू यांनी थेट तारीख सांगितली, म्हणाले…
नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही. जे मोदींचा फोटो लावून निवडून आले. निवडून आल्यावर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी विचार सोडला, नीती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत?” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लगावला. तसंच निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आला आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी ढोल बडावावेत असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी मागील काही दिवसांंपासून या निकालाची वाट पाहात होते. दरम्यान विद्यार्थ्यांना https://cbseresults.nic.in/ या लिंकवर क्लिक करून त्यांच्या निकाल पाहाता येणार आहे. (Central Board of Secondary Education (CBSE) class 10 exam results announced.)CBSE class 10th Result 2023 : CBSE चा दहावीचा निकाल जाहीर, कुठे पाहाल निकाल?महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. या निकालावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो, त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र ठरवले आहे. पण तरीही हे सरकार उसणं आवसान आणत आहेत. या सरकारचा अंत जवळ आला आहे. विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यात निर्णय घ्यायचा आहे.

संजय राऊत म्हणाले की, कालचा निकाल अगदी स्पष्ट आहे. ज्याला कायदा आहे त्यालाही तो कळला पाहिजे आणि जे कायद्याचे अभ्यासक नाही, त्यांनाही तो कळला पाहिजे. मात्र त्या निकालाचे चुकीचे विश्लेषण करुन भाजप आणि मिंधे गटाचे लोक हे एकमेकांना पेढे भरवत नाचत आहेत. सुप्रीम कोर्टाने काल दिलेला निकाल हा यांना नागडं करणारा निकाल आहे आणि हे दोन्ही गट काल नागडं होऊन नाचत होते.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील भरत गोंगावले यांनी दिलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फडणवीसांनी कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळली पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो, त्यांनी संपूर्ण सरकारच अपात्र ठरवले आहे. पण तरीही हे सरकार उसणं आवसान आणत आहे. या सरकारचा अंत आता जवळ आला आहे. तीन महिन्यात अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची वाढदिवसानिमित्त भेट, शिर्डी साईसमाधीचे दर्शन आणि शनि शिंगणापूर ला शनि दर्शन घेणार. जाहीर कार्यक्रम नाहीराज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. ४ जुलै रोजी ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही. २५ एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी राज्यपालांना विधान परिषद आमदार नेमण्यासाठी पुढील तारखेपर्यंत असा स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे आता ४ जुलैपर्यंत हा स्थगिती आदेश कायम असणार आहे. त्यामुळे आता हे प्रकरण दीड महिना पुढे सरकले आहे. सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर या प्रकरणाचा काय निर्णय येणार याची उत्सुकता होती.राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी वादळी वारे, यामुळे उन्हाळ्यातही पावसाळा जाणवू लागला होता. मात्र, आता राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी हंगामातील उच्चांकाची नोंद झाली आहे.

यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. Weather Update : राज्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
सीबीएसई (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीमध्ये ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत ९०.६८ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.६७ टक्के आहे.CBSE 12th Result 2023 : सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल?
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.Elon Musk : एलन मस्क होणार पायऊतार, ‘ही’ असणार नवी CEO?आयपीएलमध्ये (IPL) शुक्रवारी १२ मे २०२३ रोजी मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाशी होणार आहे. आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) बाद फेरीत आपले स्थान कायम राखणयासाठी मुंबई इंडियन्स संघाला आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. IPL 2023 : मुंबईसमोर आज गुजरातचे आव्हान, कुणाचं पारड जड?पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहनांची रांग किती लांबच्यालांब आहे, हे स्पष्ट होतं. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवरुन सिद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने नैतिकतेला जागत राजीनामा दिला पाहिजे. एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊयात. सर्वात शेवटचे न्यायालय हे जनतेचे आहे. त्यामुळे आपण हा फैसला जनतेवर सोपवुयात, जनता देईल तो कौल आपण स्वीकारू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा निवडणूक घेण्याचे आव्हान दिले.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या तसेच राजकीय, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या