Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना डिवचलं; म्हणाले,“दादा, पहाटेच्या शपथविधीच्या कथा...”

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना डिवचलं; म्हणाले,“दादा, पहाटेच्या शपथविधीच्या कथा…”

मुंबई | Mumbai

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती, बारावी परीक्षेतील पेपरफुटीवर प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरुन डिवचलं.

- Advertisement -

‘सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून आम्हाला धक्का बसला राज्यपाल कोश्यारीही अवाक झाले असंही अजितदादा भाषणात म्हणाले. पण, तुम्ही २०१९ मध्ये साखर झोपत शपथ घेतली. मी तेव्हा सकाळी टीव्ही लावली तेव्हा धक्का बसला. तो खरा आमच्यासाठी मोठा शॉक होता त्यातील अनेक कथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या आहेत,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला.

भाजप आमदाराच्या पुत्राला ४० लाखांची लाच घेताना पकडलं; घरात सापडलं ६ कोटींचं घबाड

तसेच, वर्षा बंगल्याच्या खर्चावरुन अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांना खडेबोल सुनावले. अजित पवारांकडून मला ही अपेक्षा नव्हती. कोविड काळात अडीच वर्षांसाठी वर्षा बंगला बंद होता. त्यावेळी वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी कोविड तपासणीचं प्रमाणपत्र बंधनकारक होतं. त्यावेळी अजित पवारांना फूल परवानगी होती असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

तसेच कोविड काळात वर्षा बंगल्यावर माणस नसतांना फेसबुक लाईव्ह, ऑनलाईन सुरु होतं. त्यावेळी तिथं माणसं नसतानाही वर्षा बंगल्याचं महिन्याचं बिल किती झालं? याची माहिती नाही घेतली तुम्ही? असा खोचक सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी अजित पवार यांना केला आहे. अजित पवार म्हणाले, चहात सोन्याचं पाणी टाकलं काय, तर दादा माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखी माणसं येतात. त्यांना चहापाणी पाजू नको का? ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ना? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना चागंलंच खडसावलंय.

IND vs AUS 3rd Test : इंदोर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये

तसेच वर्षावर येणाऱ्या लोकांना आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? आज अजित पवार यांनी चहापाण्याचा हिशेब काढला. मग आम्हाला सांगा तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगनेच म्हटले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी देशद्रोही असा शब्द वापरल्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. त्यांच्याविरोधात हक्कभंगही आणला होता. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘देशद्रोहाची मी सुरुवात केली नव्हती. पण अजित पवार मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्यांनी मुंबईत बॉम्ब स्फोट केला, त्यांच्यासोबत नवाब मलिकांनी व्यवहार केला. त्या नवाब मलिकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. आणि तुम्ही आम्हाला म्हणाला महाराष्ट्र द्रोही. तुम्ही म्हणता की हे घटनाबाह्य सरकार आहे, मग तुम्ही देखील घटनाबाह्य विरोधीपक्षनेता आहात का?’ असा सवाल देखील त्यांनी केला.

काय सांगता! पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट केलेली १ टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब

- Advertisment -

ताज्या बातम्या