Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहायुतीचा खाते वाटपाचा तिढा सुटणार? अमित शाह करणार मध्यस्थी

महायुतीचा खाते वाटपाचा तिढा सुटणार? अमित शाह करणार मध्यस्थी

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळात (State Cabinate) नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी राज्य सरकारचे खाते वाटप झालेले नाहीये. बहुधा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी खाते वाटप जाहीर केले जाते. मात्र अद्यापही खाते वाटप जाहीर नसल्याने हे मंत्री बिनखात्याचा कारभार हाकत आहे. गेल्या आठवड्यापासून महायुतीत (Shivsena BJP NCP Alliance) खाते वाटपाचा (Portfolio Distribution) तिढा काही केल्या सुटता सुटत नसल्याने मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे त्यामुळे आता हा वाद केंद्रीय मंत्र्यांच्या दरबारी मांडला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

- Advertisement -

त्यासाठीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा (Central Minister Amit Shah) यांच्या भेटीला जाणार आहे.

दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीगाठींमधूनही खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नाही.

राज्य सरकारने समृध्दी एक्स्प्रेसवेबाबत घेतला महत्वाचा निर्णय ; अपघातग्रस्तांना मिळणार तातडीची मदत

त्यामुळे, ‘राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा हा दिल्लीमध्ये सुटणार असून अमित शहा यामध्ये मध्यस्थी करणार आहे. भाजपकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही शिवसेनेमुळे खातेवाटपात विलंब येत आहे. शिवसेना काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास तयार आहे. आता अमित शाह यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीची समजून काढली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीने शिवसेना-भाजप खातेवाटपाची समीकरणे बिघडली असून जी खाती शिवसेना-भाजपकडे जाणार होती, त्यापैकी ९ मंत्री आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा कोटा कमी झाला आहे. एकूण ४२ पैकी उरलेल्या १४ मंत्रिपदांमध्ये तीनही पक्षांना कसे सामावून घ्यायचे असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे सर्व ९ कॅबिनेट मंत्री असल्याने राज्यमंत्रिपदाची अपेक्षा राष्ट्रवादीला असू शकते.

Chandrayaan 3 : चंद्रयान-३ उड्डाणासाठी सज्ज! ‘ही’ आहेत माेहिमेची खास वैशिष्ट्ये, जाणून घ्‍या सविस्‍तर

अर्थ खात्यावरुन विरोध

तिन्ही नेत्यांची सलग दोन दिवस बैठक होत आहेत. मात्र खातेवाटपावर एकमत होताना दिसत नाही. शिवसेना अर्थमंत्री पद अजित पवार यांना देण्यास उत्सुक नाही.त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. गृह खाते हे फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. तर महसूल खाते काढून राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी ओढवून घेता येणार नाहीये. त्यामुळे भाजपसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. या शिवाय आणखी दोन ते तीन खात्यांवरून महायुतीत बेबनाव आहे. प्रमुख खाती न सोडण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार शिवसेना आमदारांना निधी देत नसल्याचे कारण दिले होते. या तिन्ही नेत्यांची चर्चेतून मार्ग निघतल नसल्याने अमित शाह मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या