Wednesday, September 9, 2026
HomeराजकीयMaharashtra Cabinet : खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर; राज्य मंत्रिमंडळाचे...

Maharashtra Cabinet : खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर; राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय

मुंबई । Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (08 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वस्त्रोद्योग विभाग, विधि व न्याय विभाग आणि महसूल विभागाअंतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले?

  • खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द. (शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग)
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी “प्रगती (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)” प्रकल्प. प्रकल्प सन 2026-2031 या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता. (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांना भांडवली अनुदान देण्यास मंजुरी. (वस्त्रोद्योग विभाग)
  • सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदे व खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)
  • मुंबईतील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या भाडेपट्ट्याचे सवलतीच्या दराने नुतनीकरणास मंजुरी (महसूल विभाग)
  • चेंबूर येथील भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशन संस्थेला त्यांच्या वहिवाटीतील जमीन देण्यास मंजुरी (महसूल विभाग)
  • नागपूरमधील कोराडी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंजुरी (महसूल विभाग)

ताज्या बातम्या

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai वीज निर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही...