Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Expansion : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कुणाला संधी?

Maharashtra Cabinet Expansion : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कुणाला संधी?

वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर (Nagpur) येथे होणार आहे. मंत्रिमंडळाच्या यादीत (Cabinet List) आपला नंबर लागावा, यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशीरापर्यंत फिल्डिंग लावली होती.

- Advertisement -

त्यानंतर अखेर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपआपल्या पक्षातील आमदारांच्या (MLA) मंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले . महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज ३९ मंत्री शपथ घेणार आहेत.या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात या नवनिर्वाचित आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी पार पडणार असून तिन्ही पक्षातील कोणते आमदार मंत्री होणार याची यादी समोर आली आहे.

यामध्ये भाजपकडून (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, माधुरी मिसाळ, अशोक उईके, आकाश फुंडकर, आशिष शेलार आणि संजय सावकारे यांना शपथविधीसाठी फोन आले आहेत.

तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) भरत गोगावले, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, प्रकाश आबिटकर,संजय शिरसाट, संजय राठोड आणि दादा भूसे यांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली आहे. तर दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्‍यांचा पत्ता कट झाला आहे..शिवसेनेत ५ जुने मंत्री आणि ७ नवीन आमदारांना म्हणजे एकुण १२ जणांना संधी मिळणार आहे.

याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश असणार आहे. तर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोड या नेत्यांना डच्चू मिळालेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...