Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली...

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर (Nagpur) येथे होणार आहे.या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ असे एकूण ३९ मंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा, यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशीरपर्यंत फिल्डिंग लावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) मेळावा नागपुरातील देशपांडे हॉलमध्ये सुरु आहे. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तटकरे, पटेल यांची भाषणं झाली आहेत. पण नागपुरात असूनही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या मेळाव्याला अनुपस्थित आहेत. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असून त्यांच्या गैरहजेरीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसींचे नेते असलेले छगन भुजबळ काल रात्री उशिरा नागपुरात पोहोचले. त्यांचा मुक्काम सध्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात आहे. ज्या आमदारांना मंत्रिपदं मिळणार आहेत, त्या आमदारांना पक्षातील प्रमुख नेत्यांकडून फोनाफोनी सुरु आहे. भुजबळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी (Oath) फोन गेलेला नसून त्यांच्याऐवजी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Cabinet Minister List) अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. यात नाशिक जिल्ह्यातून तीन जणांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या कोट्यातून दादा भुसे यांना तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांना संधी मिळाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...