Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Meeting : पिंपळगाव बसवंतला होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय; राज्य...

Maharashtra Cabinet Meeting : पिंपळगाव बसवंतला होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपळगावकरांचा नाशिकला येणाचा प्रवास वाचणार आहे.

- Advertisement -

या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून राज्याच्या विकासाला गती देणारे आणि विविध घटकांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे (संक्षिप्त)

  • आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा ( क्रीडा विभाग)
  • नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ . या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
  • जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता ( महसूल व वन विभाग)
  • नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. त्यासाठीची पदे व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय)

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थाच्या तोंडावर झारखंड गँग नाशिकमध्ये; चोरी, दरोड्याचा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात सुरू केलेल्या हाय-अलर्ट व विशेष गस्त मोहिमेमुळे एक आंतरराज्यीय गुन्हेगारांटी टोळी...