Friday, April 25, 2025
Homeनाशिककॅबिनेट मंत्र्यांचा अनोखा अंदाज, लग्नात मंगलाष्टकाचे गायन, नरहरी झिरवाळांचा Video Viral

कॅबिनेट मंत्र्यांचा अनोखा अंदाज, लग्नात मंगलाष्टकाचे गायन, नरहरी झिरवाळांचा Video Viral

ओझे | प्रतिनिधी
कधी डोंगऱ्या देव उत्सवात पावरी वाजवणारे, कधी जत्रेतल्या तमाशात ताल धरणारे, कधी लग्नाच्या वरातीत नाचणारे,अन कीर्तनात टाळ मृदुंग वर हरिनामाच्या ठेक्यात नाचत गुंग होणारे अशा विविध रूपांमधून सतत चर्चेत असलेले नामदार नरहरी झिरवाळ यांनी आज पुन्हा एक नवे रूप दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला…

निमित्त होते कादवा कारखाना संचालक मा. बाळासाहेब जाधव यांचे पुतणीच्या लग्नाचे. औदुंबर लॉन्स मध्ये सायंकाळी लग्न सोहळ्यात नामदार झिरवाळ यांनी हजेरी लावली. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन मा.श्रीराम शेटे आणि नामदार झिरवाळ मंचावर गेले यावेळी उभय मान्यवरांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिल्यानंतर गुरुजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. यावेळी मंत्री महोदयांनीही गुरुजींकडून माईक घेतला आणि मंगलाष्टकाचे सूर अतिशय तालासुरात म्हणायला सुरुवात केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी लग्न सोहळ्यातील सर्वांनी आश्चर्य व्यक्त करीत मंत्री महोदयांना मनापासून दाद दिली.

- Advertisement -
कॅबिनेट मंत्र्यांचा अनोखा अंदाज, लग्नात मंगलाष्टकाचे गायन, नरहरी झिरवाळांचा

कॅबिनेट मंत्री असल्याचा कोणताही बडेजाव न दाखवता जिथे जातील तेथे सर्वसामान्यांमध्ये सामील होणे हा झिरवाळांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत भरला. अनेक लग्न सोहळ्यांमध्ये झिरवाळांचे नाचणे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांच्या टिकेचा विषय बनले होते. यावर श्री. झिरवाळ यांनी मी गरिबांच्या लग्नात नाचतो असे समर्थन देखील केले होते. आज मंगलाष्टकांचे गायन केल्यामुळे त्यांचे एक नवे रूप पुन्हा एकदा चर्चेला आले

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...