Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra CET 2021 परीक्षेची नोंदणी आजपासून पुन्हा सुरु; कसं कराल अप्लाय?

Maharashtra CET 2021 परीक्षेची नोंदणी आजपासून पुन्हा सुरु; कसं कराल अप्लाय?

मुंबई | Mumbai

राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२१ साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय रद्द

राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर परिस्थिती मुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पासून वंचित राहिले होते. पावसामुळे ग्रामीण भागात वीज, इंटरनेट ठप्प होते त्यामुळे सीईटी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळावी ही मागणी जोर धरत होती आणि आता तंत्र आणि उच्च शिक्षण विभागाकडून ही मागणी पूर्ण झाली आहे.

ट्विटरची आणखी एक कारवाई! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट लॉक

आजपासून पुन्हा सुरू करण्यात आलेले रजिस्ट्रेशन १६ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्यांना आता अ‍ॅप्लिकेशन फॉर्म मध्ये काही बदल करायचे असल्यास त्याची देखील सोय आहे. १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान बदल स्वीकारले जाणार आहेत. बदलांमध्ये नाव, फोटो, स्वाक्षरी, परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा असेल.

कसं अप्लाय कराल?

MAHACET चं अधिकृत स्थळ mahacet.org ला भेट द्या.

होम पेज वर तुमच्या कोर्स नुसार Maharashtra CET 2021 च्या लिंक वर क्लिक करा.

तुमचे रजिस्ट्रेशन किंवा लॉगिंन डिटेल्स भरा.

आता अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा.

ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमीट करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या