Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस करणार शरद पवारांशी बरोबरी!

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस करणार शरद पवारांशी बरोबरी!

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर किती दिवस मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम होता. बुधवारी मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्या ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ते राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असतील.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रात आत्तापर्यंत २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत २६ वेळा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात २० जणांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. यापैकी सर्वाधिक तीन वेळा शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याखालोखाल शंकरराव चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याची नोंद होती. पण आता देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांशी बरोबरी केली असून त्यांच्याप्रमाणेच तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाचा विचार करता शरद पवार १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रु. १९८०, २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ व ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ या तीन टर्म मिळून जवळपास साडेसहा वर्षं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस दोन टर्म मिळून ५ वर्षं १७ दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यासह २०१९ साली भल्या सकाळी शपथ घेतली होती. त्यानंतर पाचच दिवसांत त्यांचं सरकार कोसळलं होते. त्यामुळे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तींमध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर असले, तरी सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहिल्याची नोंदही त्यांच्याच नावावर आहे.

देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुन्हा संधी का दिली?

  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच फडणवीस हे अधिक चर्चेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विश्वास संपादन केला. एका निवडणूक सभेत मोदींनी फडणवीसांना ‘नागपूरची देशाला भेट’ असे संबोधले आणि अशा प्रकारे फडणवीसांवर विश्वास व्यक्त केला.
  • देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हान होती. कारण २०१४ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सत्तेत होते. पण बाहेर विरोधी पक्षाची भूमिका बजावायची. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा त्यावेळी शिवसेनेने प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावली. तेव्हा २०१९ साली शिवसेनेने त्यांच्यासोबतची नैसर्गिक युती तोडली ज्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर रहावे लागले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मागील महायुतीच्या सरकारमध्ये अडीच वर्ष संयमाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. देवेंद्र फडणवीस त्याआधी मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश म्हणून ही जबाबदारी पार पाडली.
  • सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झालेला. देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या टीम लीडरप्रमाणे जबाबदारी स्वीकारून पायउतार होण्याची तयारी सुद्धा दाखवली. पण पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आज निकाल सर्वांसमोर आहे.
  • राज्यातील प्रचंड अभ्यासू नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. नगरसेवक, नागपूरचा सर्वात तरुण महापौर, आमदार ते थेट मुख्यमंत्री अशी फडणवीसांची कामगिरी राहिली आहे. त्यांचा अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी, यामुळे वरिष्ठांच्या नेहमी जवळचे म्हणून देवेंद्र फडणवीस समजले जाते. त्यांच्यात अजून एक महत्वाचे कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी, कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करुन मुद्देसूद मांडणी करुन ते बोलतात. त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते.
  • फडणवीस यांची अजून एक जमेची बाजू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीतले असल्यामुळे कायम शिस्तीचे पालन केले आहे. त्यामुळे त्यांना संघाचे कायम पाठबळ मिळाले आहे. पक्षाने ठरवलेली रणनीती, निर्णय अंमलात आणण्याचे काम केले. पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात त्यांनी कधीही वक्तव्य केले नाही.
  • सलग तीन निवडणुकीत भाजपला १०० हून अधिक जागा मिळवून देण्यात यशस्वी देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. ही कामगिरी राज्याच्या राजकारणात दुर्मिळ आहे. आघाडीचे राजकारण सुरू झाल्यानंतर अशी कामगिरी कोणत्याही नेत्याला करता आली नाही.
  • फडणवीस यांचा आणखी एक गुण म्हणजे ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता. त्यांच्यावर फक्त विरोधकच टीका करतात असे नाही, तर सोशल मीडियावर भाजप विरोधी त्यांच्यावर सतत शाब्दीक हल्ला चढवत असतात. त्यांना नको-नको ते बोलतात. पण देवेंद्र फडणवीस यांनी अन्य नेत्यांसारख त्यावरुन कधीही आरडाओरड, आदळआपट केली नाही. त्यांनी ज्या टीकेला उत्तर देणे गरजेच आहे, त्या टीकेलाच उत्तर दिले.
  • राज्यातील भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी फडणवीसांचा सोशल संपर्क असल्याने कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी आहे.
  • लोकसभा निवडणुकीत भाजप, महायुतीचा मोठा पराभव झाला. त्यावेळी फडणवीसांनी समोर येत स्वत: पराभवाची जबाबदारी घेतली.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...