Sunday, April 20, 2025
Homeमुख्य बातम्याMaharashtra Crime : छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या; आईचे उपमुख्यमंत्री शिंदेंना...

Maharashtra Crime : छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या; आईचे उपमुख्यमंत्री शिंदेंना न्यायासाठी भावनिक पत्र

बीड | Beed 

येथील एका तरूणीने लग्नाच्या दिवशी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून (Harassment and Blackmailing ) मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात (Dharashiv Police Station) गु्न्हा दाखल झाला आहे. तसेच आरोपी अभिषेक कदम याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र, त्याला त्वरीत जामीन देखील मिळाला. यामुळे पुनः एकदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर मृत तरुणीच्या (Girl) आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले की,”साहेब, तुम्ही ‘लाडकी बहीण’ म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिला. पण माझ्या लाडक्या लेकीला न्याय कोण देणार? माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र, एका क्षणात ती नाहीशी झाली. काही नराधमांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुमच्या भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साक्षी आता या जगात परतणार नाही, हे आम्हाला देखील ठाऊक आहे. पण क्रुर नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे”, असे त्या महिलेने पत्रात लिहिले आहे.

या पत्रात पुढे म्हटले की,”राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब एका कार्यक्रमानिमित्त आमच्या बीड जिल्ह्यात आले होते. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सर्वांना माहित आहे, आपण असता तर पिडित बहिणीला भेटल्याशिवाय गेला नसता. याची प्रचिती महाराष्ट्राला अणि लाडक्या बहिणींना आहे. साहेब, बीडमध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (KSK) महाविद्यालय आहे, याच महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात ती शिक्षण घेत होती. काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल करुन तिच्यासोबत अनैतिक कृत्य केले. जबरदस्ती व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले, या अत्याचाराला असह्य होवून साक्षीने मामाच्या घरी धाराशिव येथे जावून गळफास घेत आत्महत्या केली.

आम्ही बीडचे रहिवासी आहोत, आरोपीही बीडचा रहिवासी आहे. माझ्या मुलीने मामाच्या गावी गळफास घेतला, त्यामुळे गुन्हाही धाराशिव सिटी पोलिस नोंद झाला आहे. शिंदे साहेब तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले, आम्हाला अपमानित केले. आम्हाला तासंतास कार्यालयाबाहेर उभे केले.ताटकळत बसवले, याची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात आहेत. आरोपीची बहीण देखील पोलीस दलात आहेत. मात्र ती पोलिस दलात कार्यरत असल्याने पोलीस (Police) मदत करत नाहीत.

ज्या आरोपी मुलाने छेडखानी केली, त्याच्या मोबाईलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केली नाही. याच दरम्यान केएसके महाविद्यालयीत दोन मुलींनी देखील आत्महत्या केली. आरोपीचे गुंडांशी संबंध आहेत. त्यामुळे इतर पालक न्यायासाठी पुढे येत नाहीत. साहेब आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर आम्हाला न्याय दिला असता, आताही केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची आस आहे”,असे त्या पत्रात म्हटले आहे.

 

 

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; तिघांचा मृत्यू, सरकारी शाळा, रस्ते,...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था  जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला असून, ढगफुटी...