Tuesday, September 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर CBI कडून गुन्हा दाखल; FIR...

मोठी बातमी! दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर CBI कडून गुन्हा दाखल; FIR मध्ये ‘या’ बड्या नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांची नावे

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तपासाला वेग

मुंबई | Mumbai

राज्यातील बहुचर्चित दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian Death Case) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर या प्रकरणात रीतसर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. त्यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आणि त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ही एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली आहे. दिशाच्या मृत्यूमागे घातपात आणि कटकारस्थान असल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आता या एफआयआरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे बॉलिवूड अभिनेते सूरज पंचोली आणि डिनो मोरिया यांचीही नावे आहेत.

गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद

सीबीआयने या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार/सामूहिक अत्याचार), १२०-बी (गुन्हेगारी कट रचणे), २०१ (पुरावे नष्ट करणे) तसेच २१७ आणि २१८ या अत्यंत गंभीर कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात नेमकं कोणाला मुख्य आरोपी करण्यात आले आहे, याचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, या तपासात राजकीय आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विशेष डीएसपींच्या नेतृत्वाखाली पथक

या हाय-प्रोफाईल प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयच्या दिल्ली मुख्यालयातील (Delhi Headquarters) विशेष पोलीस उपअधीक्षक (DSP) पुराण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डीएसपी पुराण सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक ८ जून २०२० च्या रात्री नक्की काय घडले होते, याचा शोध घेणार आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

८ जून २०२० रोजी मालवणी (मालाड) येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात आढळला होता. सुरुवातीला दिशाचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, तिच्या वडिलांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआयच्या या नव्या कारवाईमुळे या बहुचर्चित प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.

ताज्या बातम्या

ऊस

State Cabinet Meeting: ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन...

0
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला अभ्यासिका व वाचनालयासाठीच्या भाडेपट्ट्यासाठी मुद्रांक शुल्क माफ मुंबई | Mumbaiमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी,...