Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (Maharashtra Tour) आहेत. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यासाठी आयुक्तांनी सर्व सरकारी संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आयुक्त राजीव कुमार यांनी ११ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेत महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले. यावेळी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला महत्वाच्या सूचना केल्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाशकात आगमन

यावेळी बोलतांना कुमार म्हणाले की, आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसेच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आली, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा :  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन; नेमकं कारण काय?

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेत (Maharashtra Election 2024 ) एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज लोकार्पण

तसेच पहिल्यांदा मतदान (Voting) करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात (Maharashtra) चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार (New Voter) आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील. तर राज्यांत महिला मतदारांमध्ये (Woman Voter) लक्षणीय वाढ झाली असून १०.७७ लाख इतक्या मतदार आहेत. याशिवाय थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ असून राज्यातील दिव्यांग मतदार ६.३२ लाख एवढे आहेत, असेही राजीव कुमार यांनी म्हटले.

हे देखील वाचा :  ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्याला तब्बल १५ बक्षिसे जाहीर; ७.५ कोटींच्या बक्षिसांची लयलूट

राज्यात एकूण १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार

शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या ४२ हजार ५८५, तर ग्रामीण महाराष्ट्रात ५७ हजार ६०१ मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. तर ३५० असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील. तसेच शहरातील मतदान केंद्रावर १०० टक्के सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न असणार असून काही मतदान केंद्र महिला नियंत्रित करतील, असेही निवडणूक आयुक्त कुमार म्हणाले.

मतदारांना ‘या’ ॲपवर करता येणार तक्रार

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आले आहे. या ॲपद्वारे मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या ॲपवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम त्याठिकाणी पोहचेल, असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले.

निवडणूक काळात एटीएम व्हॅनला निर्बंध

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. तसेच याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवले जाईल, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या