मुंबई । Mumbai
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी अद्यापही सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युती तुटणार असल्याची माहिती आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत अडीच वर्षे असणारी युती संभाजी ब्रिगेड तुटणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेडच्या जागांवरती उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. संभाजी ब्रिगेड शिवसेना ठाकरे गटासोबत असणारी अडीच वर्षांची युती तोडणार आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाचे म्हणजे, संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगें यांचयबरोबर जाणार आहेत. मराठा क्रांती मोर्चा आता नेमकी कोणाला उमेदवारी देतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.