Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला हायकोर्टाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला हायकोर्टाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ( Actor Nawazuddin Siddiqui) त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी (Shamsuddin Siddiqui) आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्याविरुद्ध दाखल केलेला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या खात्यांमधील पैशांचा गैरव्यवहार करण्याबरोबर प्रतिष्ठा मलिन केल्याचा आरोप आहे. याच आरोपांवरुन नवाजुद्दीनने मानहानीचा खटला दाखल केला होता. 

- Advertisement -

अभिनेता-निर्माता नवाजुद्दीनने २००८ मध्ये शमसुद्दीनला व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते. शमसुद्दीनकडे ऑडिटिंग, आयकर रिटर्न भरणे आणि इतर आर्थिक कामांचे व्यवस्थापन करणे यांसारख्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच शमसुद्दीनकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक पासवर्ड, चेक बुक, ईमेल आयडी आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे देण्यात आली होती, असा दावा नवाजुद्दीनने याचिकेत (Petition) केला होता. 

अभिनयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी नवाजुद्दीनने भावाकडे आर्थिक कामांची जबाबदारी सोपवली होती. याच विश्वासाचा शमसुद्दीनने गैरफायदा उठवला आणि आपली फसवणूक केल्याचा आरोप नवाजुद्दीनने केला होता. इतकेच नव्हे तर शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या विभक्त पत्नीला खोटे खटले दाखल करण्यास प्रवृत्त केले. अंजनाने लग्नापूर्वी स्वतःला अविवाहित मुस्लिम महिला म्हणून खोटे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु ती तेव्हा विवाहित होती. शमसुद्दीन आणि अंजना या दोघांनी मिळून जवळपास २० कोटी रुपयांचा गैरवापर केला. दोघांनी माझी सोशल मिडीयात (Social Media) प्रचंड बदनामी केली, असा दावा नवाजुद्दीनने केला होता. तथापि, न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नवाजुद्दीनचा दावा मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आणि दावा फेटाळून लावला.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबा रुग्णालयात प्रशासनाची मनमानी

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत चालणार्‍या साईबाबा व साईनाथ रुग्णालयात प्रशासनाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केला आहे....