अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्यातील महायुती सरकारने शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यात नगर जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्हा बँकेच्या १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ होणार आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. यासाठी बँकांना पुन्हा कर्जाच्या रक्कमेची विगतवारी करून आकडेवारी घ्यावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारच्या कर्जमाफीवर काम सुरू होते. नगर जिल्ह्यात शेतीला अर्थ पुरवठा करणारी सर्वात मोठी आर्थिक संस्था म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा बँकेने या पूर्वीच राज्य सरकारच्यावतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर कर्जमाफीसाठी शेतकन्यांच्या थकीत कर्जाची आकडे आणि त्यांची संख्या याबाबतची माहिती ऑनलाईन सादर केलेली आहे. यात नगर जिल्ह्यात जवळपास २ लाख ७५ हजार शेतकऱ्यांचे शेती कर्ज थकीत असल्याचे जिल्हा बँकच्च्यावतीने शासनाला कळवण्यात आले होते.
आता राज्य सरकारच्या वतीने कर्जमाफीच्या घोषणेसह यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यात जिल्हा बँकलह राष्ट्रीयकृत बँकांना पिक कर्जासह ३० सप्टेंबरपर्यंत दोन लाखापर्यंत थकीत कर्ज आणि शेतकऱ्यांची आकडेवारी ही घ्यावी लागणार आहे. अथवा घेतलेल्या आकडेवारीत पुन्हा फोड करून त्यात पिक कर्ज आणि दोन लाखांपर्यंतचे कर्जदार यांची माहिती घ्यावी लागणार आहे. दाम्यान, नगर जिल्ह्यात यंदा नियमित कर्जफेडणान्या जिल्हा बँकेच्या १ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार असल्याचा अंदाज सुत्रानी व्यक्त केला आहे.
ऑनलाईन होणार गाळण
यंदाच्या सरकारच्या कर्जमाफीत जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी आपली माहिती ऑनलाईन भरलेली आहे. या माहितीच्या आधारे ऑनलाईन पध्दतीने कर्जदारांची छानणी होवून यात शासकीय नोकरदार, शिक्षक, जिल्हा परिषद, महसूल, महानगर पालिका कर्मचारी यासह खासगी नोकरीत असणारे शासनास कर भरणारे यांची नावे वगळी जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बँकेची वसुली अडीच टक्के
गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारच्यावतीने कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम नगर जिल्हा बँकेच्या वसूलीवर होतांना दिसत आहे. बँकेची ५ मार्च अखेर वाटप केलेल्या ३ हजार कोटींच्या कर्जापैकी अवधी अडीच टक्के वसूली झालेली आहे. याचा परिणाम बँकेच्या आर्थिक गणितावर होणार आहे.




