Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Holi Gift: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; होळीपूर्वी मिळणार खास भेटवस्तू

Ladki Bahin Holi Gift: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; होळीपूर्वी मिळणार खास भेटवस्तू

मुंबई । Mumbai

महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. निवडणुकांमध्ये देखील या योजनेवरुन जोरदार प्रचार झाला. राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये महिलांवर आधारित प्रचार करण्यात आला. यामध्ये आता महिलांसाठी महायुती सरकारने आणखी एक भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

लवकरच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

साडी देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात साड्या पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.

लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.

लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.

महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहे. परंतु साडीचा दर्जा चांगला असावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. महिलांना त्यांच्या आवडत्या रंगाच्या आणि चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...