Friday, February 6, 2026
Homeमहाराष्ट्रCabinet Decisions : निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत १९ मोठे निर्णय

Cabinet Decisions : निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत १९ मोठे निर्णय

मुंबई । Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता (Maharashtra Vidhan Sabha Election) कधी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून विविध निर्णय घेण्याचा सपाटा सुरु आहे.

- Advertisement -

दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decision) अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील १२५ एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १९ निर्णय घेण्यात आले आहे.

YouTube video player

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय

  1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
  2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
  3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
  4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
  5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
  6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
  7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
  8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
  9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
  10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
  11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
  12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
  13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
  14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
  15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
  16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
  17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
  18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
  19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...