अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले आहे. या नगर जिल्ह्यातील ३९ गोशाळांचा समावेश असून त्यांना १ कोटी ७६ लाख ९८ हजारांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.
या योजनेत मंजूर अनुदान हे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च असे ३ महिन्यांचे आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय ५० रुपये प्रमाणे अनुदान योजनेंर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अभिनंदन केले. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विकासाचे गतिमान होण्यास मदत होणार आहे. राज्यातील अधिकाधीक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोगाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या असून देशी गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे सुरु असलेले काम प्रशंसनीय आहे. यामुळे देशी गोवंश संरक्षण व संवर्धन होणार असल्याचे, म्हटले आहे. या ऑनलाईन अनुदान वितरण प्रसंगी आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयोगाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यांना मिळाले अनुदान
जीवदया मंडळ गोशाळा संगमनेर ३९८, पांजरपोळ गोरक्षण संस्था नगर २१३, गोधाम गोशाळा अकोले २८३, श्रीकृष्ण गोशाळा पाथर्डी २८३, रुक्मिणी माता गोशाळा कर्जत २१८, माऊली कृपा गोशाळा पारनेर ३०१, उज्वल गोसंरक्षण गोशाळा संगमनेर ११५, अरुणोदय गोशाळा नगर ११६, निसर्गसृष्टी गोपालन संस्था नगर १६२, बाजीराव आबा मरकड गोशाळा पाथर्डी १८४, सदुरु गंगागिरी महाराज संस्थान ट्रस्ट सरला बेट श्रीरामपूर ७९, गोविंद गोशाला कर्जत ३८, सातेश्वर व रामेश्वर गोपालन संस्था साकत जामखेड ९१, श्रीकृष्ण गोशाळा नेवासा ६३, आनंद गो संरक्षण संस्था कोपरगाव ९८, भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव ८०, गोपाळकृष्ण गोशाळा चिंचविहिरे राहुरी ९३, श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट कोपरगाव ६०, श्री गोरक्षनाथ देवस्थान देवस्थान ट्रस्ट नगर ७५, श्री शनेश्वर देवस्थान संचलित गोशाळा शनिशिंगणापूर, नेवासा ८२, संत जनाबाई महिला मंडळ गोशाळा पाथर्डी १०१, एकलव्य गोशाळा मानची हिल आश्वी संगमनेर ६१, रामदुलारी सत्यनारायण खटोड गोशाळा श्रीरामपूर ३६, श्री काळभैरव देवस्थान नगर ५५, राधाकृष्ण गोशाळा वांबोरी राहुरी ६४, श्री दत्त साई गोशाळा संस्था पारनेर ३५, भैरवनाथ गोपालन संस्था पारनेर ५१, ज्ञानेश्वरी गोपालन संस्था उक्कलगाव श्रीगोंदा ४२, शिवसाई गोशाळा कुंभारी नगर ५१, सुदर्शन गोशाळा नगर ६०, यशोदानंद गोशाळा संगमनेर ३८, श्री लक्ष्मीनारायण गोशाळा नगर ६२, श्री माऊली स्वदेशी गोपालन संस्था अकोले २३, वन्यजीव संवर्धन सेवाभावी संस्था श्रीगोंदा ५१, मुरली देशी गोजतन संस्था श्रीगोंदा ३२, श्री गांगेय गोशाळा जामखेड ५०, लक्ष्मी गोशाळा नगर ५४, साई गुरुमाऊली गोशाळा शिर्डी राहाता १५ आणि संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा श्रीगोंदा ३७यांचा समावेश आहे. या गोशाळांना १ कोटी ७६ लाख ९८ हजार अनुदान मंजूर झाले आहे.
अनुदान पात्रतेच्या अटी
महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र. संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा. गोशाळेत किमान ५० गोवंश असणे आवश्यक. संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगींग करणे अनिवार्य. ईअर टॅगिंग झालेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र राहणार आहे. संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असने बंधनकारक राहणार आहे.