Saturday, May 4, 2024
HomeमनोरंजनLata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाचा दुखवटा, उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी...

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाचा दुखवटा, उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई | Mumbai

दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. लता मंगेशकर यांना करोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने (maharashtra government) दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील (mantralaya) तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या