Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य सरकारने समृध्दी एक्स्प्रेसवेबाबत घेतला महत्वाचा निर्णय ; अपघातग्रस्तांना मिळणार तातडीची मदत

राज्य सरकारने समृध्दी एक्स्प्रेसवेबाबत घेतला महत्वाचा निर्णय ; अपघातग्रस्तांना मिळणार तातडीची मदत

मुंबई | Mumbai

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांचे प्राण गेले तर अनेक जखमी झाले आहेत. अशातच आता राज्य सरकारने अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) लवकरच एअर अॅम्ब्युलन्स (Air Ambulance) सेवा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकार लवकरच समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांसोबत राज्य सरकारची चर्चा सुरु आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एखादी दुर्घटना घडल्यास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करता येणे शक्य होईल आणि जखमींना योग्य उपचार मिळतील. यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित हेलिकॉप्टर कंपन्यांशी करार करणार आहे.

राऊतांच्या घरी सापाची एन्ट्री ; अन् पुढे घडलं अस काही

समृद्धी महामार्ग राज्याच्या विदर्भ भागाला राजधानी मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग राज्य सरकारने बनवला असून जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग बांधण्यात आला आहे. मात्र आता हाच महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून या महामार्गाची ओळख व्हायला लागली आहे.

नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना वाहन चालक हे रोड हिप्नोसिसचे बळी ठरत आहेत, ज्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा महामार्ग सुरु झाला असून गेल्या ६ ते सात महिन्यात जवळपास १ हजारावर अपघात या महामार्गावर झाले असून यात १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Rain Update : हिमाचलसह पंजाबमध्ये पावसाचा हाहाकार; हजारो कोटींचे नुकसान, अनेकांचा मृत्यू

दरम्यान, हे अपघात झाल्यावर जिवीत हानी टाळण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समृ्द्धी महामार्गालगत जवळपास १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान महामार्गाच्या बोगद्या विभागाजवळ असणार आहे, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.

समृद्धी महामार्गावर नुकत्याच सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण अपघातात २६ जणांचा बळी गेला. बस उलटल्यानंतर लागलेल्या आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघात झाल्यानंतर जखमींना घटनास्थळी कोणतीच मदत न मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, महामार्गावर कोणतेच ब्रेक पॉईंट नसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या घटनेनंतर राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गावर अनेक सुविधा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या