Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषद निवडणुकीआधी भाजपची वेगळी चाल; 'त्या' १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

विधानपरिषद निवडणुकीआधी भाजपची वेगळी चाल; ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली

मुंबई | Mumbai
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. त्यातच आता पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका होणार आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या महायुतीने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. एका बाजूला विधान परिषदेची निवडणूक सुरु असताना भाजपने राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष वळवले आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त आमदारांचा प्रलंबित प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यापासून हा विषय प्रलंबित आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी १२ आमदारांच्या नियुक्तीचे घोंगडे भिजत ठेवल्यामुळे टीका महाविकास आघाडीकडून झाली होती. आता हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत.

- Advertisement -

महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ४ जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. १२ आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा आल्या होत्या.

येत्या १२ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात भाजप सर्वाधिक ५ जागा लढवत आहे, तर शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ जागा लढवत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची नियुक्ती थांबवली होती. त्यानंतर राज्यपालनियुक्त १२ आमदारांचे प्रकरण न्यायालयात गेले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. येत्या ४ जुलै रोजी याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या सुनावणीदरम्यान महत्त्वाचा निर्णय होऊन १२ राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीसाठीही भाजपनं हालचाली सुरु केल्या आहेत. ४ जुलैला न्यायालयाकडून आमदारांच्या नियुक्तीला ग्रीन सिग्नल मिळेल याबद्दल भाजप आशावादी आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या