Tuesday, April 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; शिंदेंच्या विभागाच्या 'या'...

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; शिंदेंच्या विभागाच्या ‘या’ तीन धडाकेबाज निर्णयांचा समावेश

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीत गृह, महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक तीन निर्णय घेण्यात आले आहेत.

त्यात, नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली आहे. तसेच कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी (Death) भरपाई देण्याच्या धोरणास देखील मंजूरी देण्यात आली. त्याचसोतब लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे

१) चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर

२) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी.

३) नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता

४) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय

५) नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार.

६) भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्‍या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय

७) लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Politics : फेक एन्काऊंटर बाबतच्या विधानाची चौकशी होणे गरजेचे –...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंधुदुर्ग हत्या (Murder) ही बीड पेक्षा गंभीर घटना आहे. निलंबित पोलीस अधिकार्‍याने सांगितलेल्या फेक एन्काऊंटर (Fake Encounter) बाबतच्या विधानाची चौकशी...